Press "Enter" to skip to content

मुंबई- गोवा महामार्गावरील बंदिस्त पुल फुगल्याने राष्ट्रवादीकडून डोहाळे जेवणाचा अनोखा उपक्रम ; जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबरला आंदोलन

पेण ( प्रतिनिधी ) -: कोकणातील एकमेव असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची आजही दयनीय अवस्था असून येत्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांचे पुन्हा हाल होणार आहेत त्यातच महामार्गावर बांधण्यात आलेले बंदिस्त पुल जागोजागी फुगल्यामुळे त्या ठिकाणी केव्हाही अपघात होण्याची दाट शक्यता पाहता सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर 2026 रोजी अर्धवट असणाऱ्या नागोठणे पुलावर डोहाळे जेवणाचा अभिनव उपक्रमाचा आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील 18 वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गाचे काम सुरू असून आजही अनेक ठिकाणी हे काम अर्धवट स्थितीत आहे तर जागोजागी बांधलेले बंदिस्त पुल फुगलेल्या अवस्थेत असल्याने येथून दररोज होणाऱ्या वाहतूकीमुळे सदर पुलाचा धोका वाढत चालला असून तो कधीही ढासलण्याची भीती निर्माण झाली आहे.तर नागोठणे पुलाचे काम अजूनही रखडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी तरी हे काम पूर्ण होणे गरजेचे असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागोठणे पुलावर डोहाळे जेवण या अभिनय उपक्रमाद्वारे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्यामुळे सदर आंदोलनाला कार्यकर्त्यांसह नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.