Press "Enter" to skip to content

शिवसेना महिला संपर्क संघटिका निधीताई शिंदे यांनी घेतली पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिलांची बैठक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी नवीन नेमणूक झालेल्या शिवसेना महिला संपर्क संघटिका निधीताई शिंदे यांनी नुकतीच पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिलांची एक बैठक घेतली. निधी शिंदे यांनी महिलांचे संघटन कौशल्य, नवीन महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका चालू असलेली मतदार नोंदणी त्याचप्रमाणे शिवसेना सभासद नोंदणी अशा अनेक विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे उपस्थित महिलांनी विविध विषयावर विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाप्रमुख दीपक निकम शिवसेना पनवेल महानगरपालिकेतील गटनेत्या सौ लीना ताई गरड, सह संपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे दिली या बैठकीला शिवसेना नगरसेविका रितिक्षा गोवारी व मेघना घाडगे उपस्थित होत्या

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.