
पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव अलिबाग येथे पार पडला होता त्या प्राथमिक फेरीमध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची कु. प्राजक्ता सागवेकर आणि कु.रोशनी सावंत यांनी यश प्राप्त केले.
या झालेल्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे विषय मांडण्यात आले होते त्यामध्ये हिंदीच्या झालेल्या स्पर्धेत कु. ईशा घोणे व कु.नाजिया अन्सारी यांनी सुद्धा यश संपादन केले.त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुरलीधर वाघ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.डॉ विनायक पवार, डॉ.हिरामण टोंगारे, डॉ.श्रीकांत महादाने आदिंनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




Be First to Comment