रा .जि .प शाळा कडापे येथें वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य वाटप
By City Bell on September 8, 2026
प्रतिनिधी आवरे (निलेश गावंड)
दरवर्षी येणारा वाढदिवस पण तो कुठे आणि कसा साजरा करावा ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे आज संपन्न झालेला रिहांश पाटील आणि निवास गावंड सर व शंकर पाटील यांचा वाढदिवस. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रोफेसर प्रशांत म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना दिलेली अनोखी शैक्षणिक दिलेले भेट हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होय.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कडापे शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकर पाटील माजी अध्यक्ष राजिप शाळा आवरे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्ह्णून शिक्षण घ्या आईवडील शिक्षक यांचा आदर्श घ्या असे सांगितले. तसेच निवास गावंड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना 1992 पासून सुरू झालेला कडापे शाळेचा प्रवास ते आता पर्यंत विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती आणि शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्यासाठी केलेले अथांग प्रयत्न कसे आदर्शदायी आहेत हे प्रेरणादायी आहे हे सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी रिहांश यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख म्हणून रा जि प शाळा कडापे आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप केले. निवास गावंड सर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप केले. शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रोफेसर प्रशांत म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना अनोखी शैक्षणिक कला साहित्य व इतर भेट ही दिली.
या कार्यक्रम प्रसंगी आवरे गावातील सामजिक कार्यकर्ते शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच मर्दनगड संवर्धन समिती अध्यक्ष आणि उरण तालुका इको संघटना अध्यक्ष शंकर गुरुनाथ पाटील आणि शंकर पाटील यांच्यामागे नेहमी खंबीरपणे सोबत राहणारे निलेश गावंड,निवास गावंड सर स्नेहा थळी साक्षी थळी पल्लवी थळी राजेश्री पाटील प्रशांत म्हात्रे शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर सर शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश ठाकूर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रोफेसर प्रशांत सर यांनी केले.
Be First to Comment