Press "Enter" to skip to content

खोपोलीतील माउंटन व्ह्यू रेसिडेन्सीत रंगले युवा ‘लोकशाहीचे अधिवेशन’

खोपोली : प्रतिनिधी

लोकसभा सभागृहातील चर्चेचा माहोल, सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिका, प्रश्नांची सरबत्ती आणि त्याला दिली जाणारी संयमी उत्तरे असे चित्र प्रत्यक्ष राजकीय अधिवेशनाचे नसून माउंटन व्ह्यू रेसिडेन्सीतील (NVR) युवकांनी रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित केलेल्या अनोख्या “ऑल इंडिया पॉलिटिकल पार्टी मीटचे” होते.

माउंटन व्ह्यू रेसिडेन्सीच्या युवा पिढीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांनी आपापल्या पक्षाची भूमिका तर्कसंगत आणि प्रभावीपणे मांडली. प्रश्नोत्तरांच्या सत्रात एकमेकांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित करताना प्रतिनिधींनी आत्मविश्वास, संयम आणि मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी युवकांना केवळ प्रेक्षक न ठेवता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे एखाद्या विचारसरणीशी सहमत किंवा असहमत असण्यापेक्षा ती समजून घेऊन तिच्या बाजूने युक्तिवाद करण्याचा वेगळा अनुभव युवकांना मिळाला.

लोकशाहीतील संवाद आणि मतभिन्नतेचा आदर यांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या उपक्रमामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या “बेस्ट डेलिकेट अवॉर्ड” द्वारे प्रभावी सहभाग, संवादकौशल्य, आत्मविश्वासपूर्ण मांडणी, मुत्सद्देगिरी आणि चर्चेतील योगदानाची दखल घेण्यात आली.

माउंटन व्ह्यू रेसिडेन्सीतील युवकांनी कल्पकतेने साकारलेल्या या उपक्रमातून लोकशाहीच्या प्रक्रियेचा अनुभव घेत नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित करण्याचा आगळा प्रयोग यशस्वी झाला.

सभागृहाचे पदाधिकारी म्हणून खालील प्रमाणे सर्वांनी भूमिका पार पाडली.

सभापती — शान्वी शाह
सरचिटणीस — स्मिता साळवी
वृत्तांतलेखक — अर्णव खेडकर

सत्तापक्षाचे प्रतिनिधी
पंतप्रधान — अदिती राज (मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी)
गृहमंत्री — अर्णव धवडे (मा. गृहमंत्री अमित शाह)
केंद्रीय मंत्री — स्वरा अडसूळ (मा. अन्नपूर्णा देवी)
केंद्रीय मंत्री — पूर्णिमा खेडकर (मा. अश्विनी वैष्णव)
केंद्रीय मंत्री — अथर्व पाटील (मा. मनसुख मांडविया)
विरोधी पक्षाचे प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते — अंकुश शाह (मा. राहुल गांधी)
काँग्रेस नेत्या — वेदिका गाढवे (मा.प्रियंका गांधी वाड्रा)
काँग्रेस खासदार — वेदांत गाढवे (मा.गौरव गोगोई)
विरोधी पक्षाच्या नेत्या — नील कावडे (मा.आतिशी मार्लेना)
विरोधी पक्षाचे नेते — नयन पोळ (मा.अरविंद केजरीवाल)

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.