
पनवेल : प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन लायन्स डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 मधील विविध क्लबतर्फे आश्रम शाळा, चिखले येथील 21 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांतपाल प्रवीण सरनाईक तर विशेष अतिथी म्हणुन द्वितीय प्रांतपाल विजय गणात्रा हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना प्रवीण सरनाईक यांनी भावी पिढी घडविण्यात शिक्षकांच्या योगदानाचे खूप महत्त्व असल्याचे सांगुन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. लायन्स चळवळीची उपस्थितांना माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की ते सक्षम झाल्यावर त्यांनी सुद्धा अशीच सेवेची भावना मनात ठेवली पाहिजे. याच प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले.
दिवसेंदिवस भारतात वाढत जाणाऱ्या कॅन्सर आणि लहान मुलांच्या कॅन्सर संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्टचे कॅन्सर आणि चाईल्ड कॅन्सर चेअरमन मुश्ताक खान यांनी जनजागृती विषयी मार्गदर्शन केले.
या वेळी शाळेतर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन प्रवीण सरनाईक यांचे हस्ते करण्यात आले.
शाळेतर्फे मुख्याध्यापक विष्णू गायकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तर सूत्र संचालन संजय गोडसे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन बाल शिक्षण कमिटीचे राजेशकुमार, जिल्हा सहखजिनदार संजय गोडसे आणि मुश्ताक खान यांनी केले होते तर यामध्ये न्यू पनवेल स्टील टाऊन, पनवेल सरगम, उलवे जेम्स, नवी मुंबई प्लॅटिनम, तुर्भे, सीबीडी, नेरुळ हे क्लब सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला जागृती पाटील, आदित्य दोशी, राजेश जगासिया, स्वाती गोडसे, श्रेया तिवारी, ए सी झुल्का, आर पी पांडे आदि लायन परिवार तसेच शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Be First to Comment