Press "Enter" to skip to content

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार! शिक्षण अन् पाककलेतील १३ गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव!

मुंबई:
गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान टिकवून असणाऱ्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने एक भव्य व दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला या क्षेत्रांत अद्वितीय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १३ गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची मिळवून देणाऱ्या गृहिणींचा ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला, तर शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त गुणवंतांची यादी:
अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ (१२ विजेत्या):

  • सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर
  • सौ. स्वाती ऐलेश जोशी
  • सौ. भावना खंडारे
  • सौ. मनीषा सचिन पाळेकर
  • सौ. तृप्ती सगुण माणगावकर
  • सौ. नीता जितेंद्र पाठारे
  • अरुणा गोपाळ चरपे
  • सौ. वंदना सुनील भुजाडे
  • सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप
  • सौ. मोहिनी मोहित घरत
  • सौ. भाविका भरत गोंधळी
  • वैशाली संतोष सुतार
    ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६:
  • सौ. रंजना राजेंद्र शिंदे (शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल)
    संस्थेची २४ वर्षांची उज्ज्वल परंपरा
    २००३ सालापासून मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था ही स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली निरंतर सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्ष संवर्धन व साहित्य या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते.
  • शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि पाककलेच्या माध्यमातून जपलेली पारंपरिक व आधुनिक संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील गुणवंतांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.
    या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्यासह श्री शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे, मा. सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदाताई शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, श्री मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, श्री संदेश कदम आणि शिक्षिका सौ. भावना खंडारे, श्री. आर. विजयसिंह यांचे विशेष सहकार्य व योगदान लाभले. उपस्थितांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.