Press "Enter" to skip to content

जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा

पनवेल – पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत आनंददायी शनिवार अंतर्गत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी व शैक्षणिक कृती घेतल्या. व्यायामाचे प्रकार, कविता, गाणी, गोष्टी, गणिती कृती आणि वाचन अशा उपक्रमांतून मोठ्या विद्यार्थ्यांनी लहानग्यांना आनंद दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित झाली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी राधा-कृष्ण व गोविंदा यांच्या वेशभूषेत शाळेत आले होते. सर्वांनी मिळून उत्साहात गोपाळकाला साजरा केला. पारंपरिक वेशभूषा, विविध कृती आणि सामूहिक सहभागामुळे शाळेचा परिसर आनंदाने आणि उत्साहाने भरून गेला.आनंदातून शिक्षण आणि कृतीतून अनुभव देणारा हा आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.