
पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या त्यामध्ये नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पदी रेवलसिद्ध ठेंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
यापूर्वी नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या ऐवजी पोलीस निरीक्षक रेवनसिद्ध ठेंगले यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी नुकतीच गणपती सणाचे अनुषंगाने गोवा रोडवरील हॉटेल चालक तसेच सीएफएस कंटेनर यार्ड यांचे व्यवस्थापक यांची बैठक घेऊन गणपती सणाचे अनुषंगाने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतुकीचे अनुषंगाने कोणतीही अडचणी येणार नाही व वाहतूक सुरळीत राहील याबाबत मीटिंग घेऊन सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक रेवनसिद्ध ठेंगले या मी यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम केले असून बांगलादेशी नागरीकांचे कर्दनकाळ अशी त्यांची ख्याती आहे 200 हून अधिक बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिकांना त्यांनी अटक करून पुढील कार्यवाही करून बांगलादेशी रवाना केले आहे त्या अनुषंगाने त्यांना मुंबई पोलिसांकडून अनेक बक्षिसे मिळालेली आहेत
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत पळस पाहते खारपाडा रोड तसेच डेरवली ते दांडपाठार रोड कोण फाटा ते रसायनी हा रोड येत असून येणारे गणपती सणाचे अनुषंगाने नागरिकांना व गणेश भक्तांना कोणताही अडथळा होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी व उपाय योजना करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोनगाव आजीवली शेडुंग शिरडून पळस्पे परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना भेटून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Be First to Comment