

पेण, ता. ५ (वार्ताहर) : देशभरात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना पेणमध्ये सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घेत रामेश्वर कंट्रक्शनचे मालक तथा प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ पिचीका यांच्या वतीने होणाऱ्या दरवर्षीच्या विशेष मुलांच्या दहीहंडी उत्सवात येथील आई डे केअर संस्थेतील बौद्धिक अक्षम दिव्यांग, गतिमंद मुलांनी सहभाग घेत येथील दहीहंडी फोडली यावेळी त्याच्यावर होणाऱ्या पाण्याच्या फवा-यांने त्यांनी आनंद साजरा केला.
दहीहंडी उत्सव हा तरुणांचा उत्साह आणि सहाशी खेळ यामध्ये दहीहंडी दिवशी तरुणवर्ग जोशात असून त्यांचा उत्साह वाढत असतो मात्र या उत्सावात दिव्यांग, गतिमंद मुलांना हे खेळ खेलता येत नाही बाब लक्षात घेऊन प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ पिचीका यांनी आपल्या निवासस्थानी या विशेष मुलांकरिता दहीहंडी आयोजन करण्याचे ठरविले आणि त्यानुसार गेली कित्येक वर्ष त्यांच्या निवासस्थानी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे.यावेळी ढोल- ताशांचा गजर, उत्साहवर्धक संगीत आणि पाण्याच्या फवाऱ्यांमुळे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले सदर मुलांनी पाण्यात चिंब भिजत दहीहंडी फोडल्याने त्यांच्या चेहऱ्यांवरील निरागस हास्याने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी
रामेश्वर कन्स्ट्रक्शनतर्फे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
गेल्या १५ वर्षांपासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान देत आहेत.या उपक्रमामुळे विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहातील उत्सवाचा आनंद अनुभवता येत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला खूप समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना आई डे केअर संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते आणि महेंद्र मोहिते यांनी बोलून दाखवली.


Be First to Comment