
जळगाव (आनंद पवार)
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरसोदे-बहादरपूर येथे श्री खंडेराव महाराज मंदिराचा १४ वा वर्धापनदिन सोहळा व अभिषेक सोहळा रविवार, दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री खंडेराव महाराजांचा वर्धापनदिन सोहळा,अभिषेक सोहळा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, परिसरातील सर्व ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन समस्त बाविस्कर परिवार व शिरसोदे-बहादरपूर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवार,दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता श्री शामसुंदर भजनी मंडळी यांच्या वतीने ह.भ.प.श्री.अशोक महाराज यांचे भक्तिमय भजन आयोजित करण्यात आले आहे.
वर्धापनदिनाच्या दिवशी सकाळी धार्मिक विधी व अभिषेक सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्री खंडेराव महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ:श्री खंडेराव मंदिर, शिरसोदे-बहादरपूर, मोंढाळे रोड.
“येळकोट येळकोट जय मल्हार!”या जयघोषाने शिरसोदे-बहादरपूर परिसर भक्तिमय होणार असून,वर्धापनदिन सोहळ्याची ग्रामस्थ व भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


Be First to Comment