Press "Enter" to skip to content

सीएसएमटीहून पनवेलमार्गे कोकणासाठी दैनिक रेल्वेसेवेचा शुभारंभ ; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश


पनवेल, दि.३ (वार्ताहर) : मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) करण्यात आला. या नवीन रेल्वेसेवेमुळे मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील प्रवाशांना नियमित प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, डॉ.खा.श्रीकांत शिंदे व खा.नरेश म्हस्के यांनी केंद्रातील हि रेल्वे गाडी सुरु होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

ट्रेन क्रमांक ०९००९ ही गाडी गुरुवारी सीएसएमटी येथून दुपारी १२.५० वाजता रवाना झाली. पनवेल स्थानकावर दुपारी २.२५ वाजता तिचे आगमन झाले. पनवेलमार्गे ही गाडी सावंतवाडी रोडच्या दिशेने रवाना झाली. नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू झाल्याने कोकण रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या रेल्वेसेवेला मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. मुंबई-कोकण प्रवासासाठी अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

रेल्वेसेवेच्या शुभारंभप्रसंगी उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, सचिन मोरे, महेश सावंत, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, विधानसभा प्रमुख नितीन काळे, महानगर संघटक राहुल गोगटे, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, अर्जुन परदेशी, स्मिता भोईर, अर्चना जाधव, आशिष पनवेलकर, जय कुष्टे, गुलाब बागवान, धिरज निंबाळकर, पनवेल प्रवासी संघाचे श्रीकांत बापट, रेल्वे अधिकारी अग्रवाल आदी उपस्थित होते. त्यांनी या गाडीचे जोरदार स्वागत केले.


नवीन दैनिक एक्स्प्रेसमुळे मुंबई व कोकणदरम्यान रेल्वे प्रवासाची सुविधा वाढली असून, प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे. — उपजिल्हाप्रमुख परेश पाटील

शिवसेनेने कोकणवासीयांचा प्रवास कायमस्वरूपी सुखरूप होण्यासाठी हि अनोखी भेट दिली आहे : नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.