Press "Enter" to skip to content

रायगड श्रावण सम्राज्ञीच्या इतिहासाच्या पाऊलखुणांसह मराठमोळा श्रावण सोहळा शानदार संपन्न

मंगळागौर, फॅशन शो, वन मिनिट गेम्स अन् लकी ड्रॉची रंगत; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने ‘श्रावण महोत्सव २०२६’ला चारचाँद

पनवेल : दिशा कल्चरल इव्हेंट प्रस्तुत, आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान आणि दिशा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावण महोत्सव २०२६’ हा सांस्कृतिक सोहळा मंगळवार, १ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात शानदारपणे संपन्न झाला.

सदर सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते सुरदासदाद गोवारी, रोहिणी गणेश साले,वारीष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे मॅडम,सहाय्यक पोलीस आयुक्त रेल्वे विभाग विमल बिडवे मॅडम,डॉ.जयश्री पाटील,माणिक जाधव यांची उपस्थिती लाभली.

आशिमिक कामठे लावणी सम्राट यांनी लावणी, गौळण कला अदा तालावर महिलांना थिरकवत सोहळ्यात रंगत आणली,‘रायगड श्रावण सम्राज्ञी’च्या इतिहासाच्या पाऊलखुणा आणि नाविन्याची जोड देत, परंपरेचा वारसा जपत मराठमोळ्या संस्कृतीचा जागर या सोहळ्यात करण्यात आला. श्रावणाच्या मंगलमय वातावरणात कला, संस्कृती, सौंदर्य, परंपरा आणि महिलांच्या आत्मविश्वासाचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

महिलांनी सादर केलेल्या मंगळागौरच्या अप्रतिम मराठमोळ्या प्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर फॅशन शोमधील आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉकने महिलांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास आणि कलागुणांचे दर्शन घडविले. महाराष्ट्राच्या इतिहासातील कर्तृत्ववान महिलांच्या गौरवशाली कार्याची झलक सादर करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

महिलांसाठी आयोजित वन मिनिट गेम्स हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. उपस्थित महिलांसाठी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमधून पैठणी जिंकण्याची संधी मिळाल्याने उत्साहाला आणखी उधाण आले. अनेक महिलांनी पैठणी पटकावत आनंद व्यक्त केला. मंगळागौर आणि फॅशन शोमध्येही महिलांनी आपल्या कलागुणांचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत विविध बक्षिसे पटकावली.

या सोहळ्यास नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील आणि मोहिनी विक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.

दरम्यान, पक्षाच्या कामकाजानिमित्त बाहेर असल्यामुळे आमदार विक्रांत दादा पाटील प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महिला भगिनींशी संवाद साधत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहिनी विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, महिलांच्या कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी आमदार विक्रांत दादा पाटील हे मुलाप्रमाणे आणि भावाप्रमाणे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापक-अध्यक्षा नीलमताई आंधळे आणि दिशा महिला मंचच्या उपाध्यक्षा विद्याताई मोहिते यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या सोहळ्याने महिलांना कला, संस्कृती, परंपरा आणि आत्मविश्वासाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मंगळागौर स्पर्धेतील
प्रथम- चंद्रकोर मंगळागौर ग्रुप
द्वितीय- गौरीधारी अक्षरग्रुप
तृतीय-श्रावणसखी मंगळागौर ग्रुप
उत्तेजनार्थ- स्वामिनी मंगळागौर ग्रुप यांनी विजेतेपद पटकावले तसेच फॅशन शो विजेती -जयश्री राठोड,कर्व्ही लूक विजेती-मधुरा दंडवते,प्रथम उपविजेती-डॉ. ललिता पवार गायकवाड,द्वितीय उपविजेती-स्नेहल जगे यांनी यश संपादन केले.

एकूणच, मंगळागौरचा मराठमोळा ठेका, फॅशन शोचा आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक, ऐतिहासिक कर्तृत्ववान महिलांचे आदर्श व्यक्तिमत्त्व सादरीकरण, वन मिनिट गेम्स, लकी ड्रॉ आणि बक्षिसांची लयलूट यामुळे ‘श्रावण महोत्सव २०२६’ हा महिलांसाठी आनंद, उत्साह आणि संस्कृतीचा अविस्मरणीय सोहळा ठरला. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत नाविन्याची जोड देणाऱ्या या ‘रायगड श्रावण सम्राज्ञी’च्या सोहळ्याने मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश दिला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.