Press "Enter" to skip to content

नवीन पनवेलमध्ये भव्य ‘दहीहंडी उत्सव २०२६’चे आयोजन; गोविंदा पथकांसाठी एकूण २ लाख २२ हजार २२२ रुपयांची बक्षिसे

पनवेल (प्रतिनिधी) श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथे ‘अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ’ आणि ‘प्रियदर्शिनी महिला मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०५ सप्टेंबर रोजी ‘भव्य दहीहंडी उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीची संस्कृती, सामाजिक एकोपा आणि गोविंदा पथकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

        या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी एकूण २ लाख २२ हजार २२२ रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील तसेच पनवेल शहरातील गोविंदा पथकांमध्ये या उत्सवाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.के. ई. एस. बांठिया हायस्कूल, नवीन पनवेल येथे हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि ‘गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा’च्या जयघोषात हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.

         या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सहभाग, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकात्मता यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या उत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक माजी नगरसेविका सौ. सुशीला जगदीश घरत तसेच नगरसेविका डॉ. अस्मिता जगदीश घरत यांनी केले असून अधिक माहितीसाठी सचिन पाटील ९७०२७७६६६६, प्रशांत आवळे ९३२०८७१४६६ किंवा संदीप पाटील ९७६९४०९१४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.