Press "Enter" to skip to content

तळोजा एमआयडीसीतील खाद्य कंपन्यांना बेकायदेशीर नोटिसा ? दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांची मागणी


पनवेल, दि.१ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसी परिसरातील सोनिया फिशरीज, संचिता मरीन, डेन्सन फूड्स आणि विस्टा फूड्स यांसह अनेक खाद्य कंपन्यांना प्रभाग अधिकाऱ्यांकडून चुकीच्या आणि बेकायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांना आज निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. यावेळी संबंधित विभागातील काही कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी आपल्या तक्रारीनिशी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, एकनाथ म्हात्रे,  उपमहानगरप्रमुख सचिन मोरे,  शहरप्रमुख राहुल कदम, शहरसंघटक अभिजित साखरे, युवा सेनेचे कपिल कुरघोडे, जगदीश ठाकूर, आशिष हवलदार, जय कुष्टे, धिरज निंबाळकर आदी उपस्थित होते.

संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्याचे किंवा कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार नसतानाही त्यांनी परस्पर नोटिसा बजावल्याचा आरोप सोमण यांनी केला आहे. कथित अनोळखी तक्रारदारांच्या नावांचा आधार घेत वरिष्ठ प्रशासनाला किंवा महापालिकेला पूर्वकल्पना न देता एकाच दिवशी सर्व कंपन्यांना एकाच नमुन्यातील नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
तळोजा एमआयडीसीतील या कंपन्या नियमितपणे मालमत्ता कर व एलबीटीचा भरणा करीत असून, हजारो स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देत असल्याचे सोमण यांनी सांगितले. अशा प्रकारे उद्योजकांवर बेकायदेशीर दबाव आणून महापालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दोषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
ॲड. प्रथमेश सोमण यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सोमण यांनी सांगितले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.