Press "Enter" to skip to content

प्रा. डॉ.श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांचा ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ने गौरव

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद 

रायगड : महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यांतर्गत ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी कोकण एज्युकेशन सोसायटी आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथील प्रोफेसर डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला.

शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठाने  ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ त्यांच्या संशोधन आणि समाजकार्यात उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव केला होता.
 

​डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी एम. एस्सी. एम. एड्. एम. फील पी. एच. डी. या उच्च पदव्यांसह CSIR-NET आणि SET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ६० हून अधिक संशोधन लेख आणि पुस्तके प्रकाशित झाले असून, ते पी. एच. डी. या डॉक्टरेट पदवीचे मार्गदर्शक म्हणून ते संशोधकांची नवी पिढी घडवत आहेत. केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी म्हणून एच. आय. व्ही. एड्स  जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, मतदार जनजागृती, वृक्षारोपण, शोषखड्डे, आणि पर्यावरण संरक्षणाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.