Press "Enter" to skip to content

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खालापूर तालुका उपाध्यक्षपदी मारुती खाने यांची निवड


रसायनी (आनंद पवार)

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी तसेच सामाजिक हिताच्या कार्यासाठी सक्रिय असलेल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खालापूर तालुका उपाध्यक्षपदी मारुती खाने यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांच्या स्वाक्षरीने मारुती खाने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.मारुती खाने हे भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या एच.ओ.सी. कंपनीमध्ये सेवेत कार्यरत होते.

सेवाकाळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे.तसेच शिवसेना पक्षातही त्यांनी सक्रियपणे काम करत संघटनात्मक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे।त्यांचा सामाजिक व संघटनात्मक अनुभव लक्षात घेऊन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने त्यांच्यावर खालापूर तालुका उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.या नियुक्तीमुळे खालापूर तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त होतआहे.दरम्यान,मारुती खाने यांच्या निवडीबद्दल संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्रपरिवार आणि समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून,पुढील सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.