

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका नवीन मुख्यालयाच्या कामाची महापौर नितीन पाटील यांच्या कडून पाहणी कारण्यात आली. यावेळी ठेकेदार तसेच पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता व संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देऊन उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवीन मुख्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक प्रशासकीय सुविधा उपलब्ध होणार असून, हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
यावेळी महापौर नितीन पाटील यांच्या समवेत पनवेल महानगरपालिका सभागृह नेते एडवोकेट प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेविका रुचिता लोंढे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Be First to Comment