Press "Enter" to skip to content

पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची भेटबहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी केली भूखंडाची मागणी


कळंबोली: रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांची पनवेल तालुका पत्रकार विकास मंच च्या सदस्यांनी पनवेल येथे गुरुवारी भेट घेतली. यावेळी पनवेल मध्ये प्रस्तावित असलेले पत्रकार बहुउद्देशीय भवनासाठी मोकळ्या भूखंड मागणीचे निवेदन यावेळी पालकमंत्र्यांना मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच हा गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे नोंदणीकृत असलेला पत्रकार मंच आहे. विविध सामाजिक उपक्रम सोबतच पर्यावरण रक्षण, रक्तदान, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळापयोगी वस्तूंचे वाटप अशा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. पत्रकार मंचाचे समाजपयोगी उपक्रमाचे काम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याकरता पनवेल तालुक्यात पत्रकार बहुउद्देशीय भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे.याकरता शासनाकडून मोकळा भूखंड मिळण्याची विनंती वजा निवेदन गुरुवारी पनवेल येथे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे देण्यात आले.

याबद्दल त्यांनी सकारात्मक संदेश दिल्याचे यावेळी पत्रकारांनी सांगितले आहे.यावेळी पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दीपक घोसाळकर, सिटीबेलचे संपादक विवेक पाटील, पत्रकार संजय कदम, दत्ता कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.