
रोहा:प्रतिनिधी
रोहा : रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कुमारी जाई विनोद श्रीवर्धनकर हिने भोपाळ येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालयात आयोजित “International Course on Inclusive Curatorship & Rethinking Community Engagement” या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमात सहभाग घेतला.
दि. १६ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या या एक आठवड्याच्या अभ्यासक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, भोपाळ यांच्या सहकार्याने International Institute for Inclusive Museum, Australia तसेच ICOM-UMAC यांच्या सहभागातून करण्यात आले होते. विविध देश व क्षेत्रांतील सहभागींचा समावेश असलेल्या या अभ्यासक्रमात संग्रहालये, समुदाय सहभाग आणि समावेशक क्युरेटरशिप याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने, केस स्टडीज व चित्रफितींच्या माध्यमातून सखोल ज्ञान देण्यात आले.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी जाई श्रीवर्धनकर हिचा राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID), अहमदाबादच्या ४४व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान झाला आहे. तसेच तिच्या उत्कृष्ट प्रकल्पासाठी Shanta Keshwan आणि N. K. Keshwan Endowment Award प्राप्त झाला होता.
या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातील सहभागामुळे जाईला विविध संस्कृती, समुदाय आणि संग्रहालय क्षेत्रातील आधुनिक व समावेशक दृष्टिकोन समजून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.



Be First to Comment