
पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तसेच शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पनवेलच्या वतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १२ सप्टेंबर रोजी पनवेलहून कोकणातील विविध ठिकाणी या बस रवाना होणार आहेत. यामध्ये राजापूर (पाली, लांजा मार्गे), रत्नागिरी (संगमेश्वर), चिपळूण, खेड आणि दापोली या मार्गांचा समावेश आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना या मोफत बससेवेचा लाभ घेता येणार असून, बसच्या जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन शिवसेना पनवेलच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत बससेवेसाठी २७ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी धीरज निंबाळकर – ९००४२३१६०२ किंवा खंडेश धनावडे – ९९८७७६१५२ यांच्याशी संपर्क साधावा.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.


Be First to Comment