
ऑल इंडिया जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार श्री संजय कदम यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या अनुषंगाने शिवसेना पनवेल विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या शुभहस्ते श्री संजय कदम यांना शाल. श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील व भरत पाटील त्याचप्रमाणे महानगर प्रमुख एडवोकेट समाधान काशीद व विभाग प्रमुख सदानंद शिर्के प्रवीण जाधव कैलास पाटील प्रभाकर गोवारी सिद्धेश चव्हाण दांगट व जयंत पाखरे उपस्थित होते



Be First to Comment