Press "Enter" to skip to content

मुलुंड मध्ये अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !


मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील

८० वा स्वातंत्र्य दिन मुलुंडमध्ये उत्साहात व एकोप्याने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.मुलुंड पोलीस ठाणे परिमंडळ ७ च्या विद्यमाने(मा. वाटेकर )वरिष्ठ पोलीस निरीक्षण मुलुंड पोलीस ठाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मुलुंड पोलीस ठाणे, मुलुंड चेकनाका पोलीस चौकी, मुलुंड कॉलनी पोलीस चौकी तसेच मुलुंड मधील बीट सर्व पोलीस मुलुंडकर नागरिक व पत्रकार यांची उपस्थिती होती.ध्वजारोहण नंतर अल्पोपहार देण्यात आला. नेहमीच्या ताण व दगदगीच्या ड्युटीतून वेळकाढून पोलीस स्टाफ यांनी देशभक्ती ची जणू मेजवानीच होती अनेकांनी आपल्या आवडीची देशभक्ती गीत गाऊन आलेल्या पाहुण्याचे मनोरंजन केले.व कौतुकास पात्र ठरले.


मेहुल सर्कल येथे अनेक वर्ष आकर्षण देखावा उभा केला जातो. यंदा भारताचे संविधान (जंतर मंतर )असा सुरेख असा देखावा उभारला होता.ध्वजारोहण (अमितजी ठाकरे) यांच्या हस्ते करण्यात आले. देखावा राजेश चव्हाण मनसे मुलुंड विभाग प्रमुख यांच्या सौजन्याने होतो.जेष्ठ संपादक, पत्रकार, लेखक (सुकृत खांडेकर )यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती.

शिवसेना शाखा १०८ उबाठा शाखा प्रमुख( शैलेश पवार ) यंदा माजीजेष्ठ शिवसैनिक नाबर यांच्या हस्ते करण्यात आले. भांडुप गाव येथे प्रथमच स्वातंत्र्य दिन पाटील परिवार मुळ मंदिर मालक श्री. मारुती व श्री. गणेश मंदिर यांनी साजरा केला.ध्वजारोहण गावातील जेष्ठ महीला (भागा म्हात्रे )यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस स्टाफ , गावातील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हौशी मंडळीने देशभक्ती गीत गाऊन कार्यक्रमाला शोभा आणली. सर्व ठिकाणी मुंबई पत्रकार( सतिश पाटील )यांची उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.