
रोहा:समीर बामुगडे
रोहा | प्रतिनिधी : रोह्यात यंदाची दहीहंडी चांगलीच गाजणार असून, रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृहासमोरील पटांगणात ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा रोह्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या आयोजनाकडे पाहिले जात असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे.
विशेष म्हणजे नुकतीच भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी अधिक दणक्यात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोह्यातील शिवसैनिकांमध्ये नव्या जोमाची लाट निर्माण झाली असून, त्याचा उत्साह दहीहंडीच्या आयोजनातूनही दिसून येत आहे.
या भव्य स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मुख्य दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख २१ हजार रुपये रोख आणि मानाची गदा देण्यात येणार आहे. याशिवाय पुरुष पथकांच्या ७ थरांच्या सलामीसाठी २१ हजार, ६ थरांसाठी ११ हजार, महिला पथकांच्या ५ थरांसाठी ७ हजार आणि ४ थरांसाठी ५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

ढोल-ताशांचा कडकडाट, गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमणारे रोह्याचे वातावरण आणि थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी होणारी चुरस यामुळे यंदाचा सोहळा अक्षरशः दणक्यात रंगणार आहे. पुरुषांसोबत महिला गोविंदा पथकांना स्वतंत्र संधी आणि बक्षिसे देण्यात आल्याने स्पर्धेला आणखी रंगत येणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी, कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, राजाभाई केणी, जिल्हा परिषद सदस्य छोट्यामशेठ भोईर, सुमित काटे, विघ्नेश माळी, मानसीताई दळवी, रोहा पंचायत समिती सदस्य देशमुख मॅडम, माजी उपनगराध्यक्ष शिल्पा धोत्रे, नगरसेविका सुप्रिया जाधव तसेच जिल्हा परिषद सदस्य उर्वशी उद्देश वाडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रोहा तालुक्यातील संघाना प्राधाने देण्यात येणार आहे
ऑगस्ट २०२६ असून, प्रथम येणाऱ्या २५ गोविंदा पथकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे पथकांमध्येही आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे.
शिवसैनिकांचा जोश, गोविंदांचा थरार आणि रोह्याचा जल्लोष—यंदाची शिवसेनेची दहीहंडी रोह्यात इतिहास घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे! नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Be First to Comment