Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये १५० वाहनचालकांची आरोग्य तपासणी; आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल : पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था, पनवेल आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सिव्हील हॉस्पिटल रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी श्री गणेश साई मंदिर, साईनगर रोड, पनवेल येथे स्कूल बस, व्हॅन चालक, त्यांचे सहकारी तसेच इतर वाहतूकदारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला वाहनचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५० वाहनचालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन श्री. सुरज पवार ( ARTO, प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल) आणि श्रीमती कल्याणी सुरतकर (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पनवेल) यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये वाहनचालकांची रक्तदाब (BP), रक्तातील साखर, ईसीजी, हेपेटायटिस बी व सी, HIV आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच उपस्थित वाहनचालकांची नेत्र तपासणी देखील करण्यात आली. वाहनचालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे त्यांच्या स्वतःच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या शिबिरासाठी महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (NGO) यांच्या वतीने प्रोग्राम मॅनेजर श्री. आनंद पाटील, डॉ. सुशील पाटील, ICTC रुग्णालय कशेळे, ता. कर्जत, जि. रायगड येथील कॉन्सिलर आशा बाळशंकर आणि लॅब टेक्निशियन स्नेहल दुधसागर यांनी सहकार्य केले.

तसेच अपोलो हॉस्पिटलच्या वतीने डॉ. गौरी समीर फडके यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले. नेत्र तपासणीसाठी श्री. अरुण कदम व श्रीमती अंजली जाधव यांनी योगदान दिले. ईसीजी तपासणीसाठी सौ. सुविधा शेडगे मॅडम तसेच डॉ. नयना अनिल महाले (PMC) यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा.लतीफभाई शेख,नगरसेविका मा. कु. आर्या प्रवीण जाधव, ऍड.मनोहर सचदेव सर, ऍड. अमोल साखरे सर यांनी सदिच्छा भेट दिली.

हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग सदाशिव हुमणे, सचिव श्री. बन्सीलाल देवराम तळेकर, खजिनदार श्री. किसन कोंडीबा रौंधळ,कार्याध्यक्ष श्री राजेश हसुराम भगत, सहसचिव अशोक महादेव पोकळे,सहसचिव श्री शरद मारुती घुले, तसेच संस्थेच्या सर्व सहकारी सभासदांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

वाहनचालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेळेत निदर्शनास आणून देण्यासाठी अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.