Press "Enter" to skip to content

लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडचा पदग्रहण सोहळा संपन्न


पेण, ता.२२(वार्ताहर) : लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडचा सन २०२६- २७ या सेवावर्षाचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला असून यामध्ये लायन्स अशोक भगत यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष प्रमोद पाठक, सचिव प्रदीप पाटील आणि खजिनदार पदावर डॉ. देविदास बामणे यांची निवड होऊन या सर्वांनी या सेवावर्षाची जबाबदारी स्वीकारली तशी शपथ घेतली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की २०२० मध्ये अध्यक्ष शशिकांत भगत यांनी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड सुरू केले या क्लबमध्ये आजवर आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचे अनेक उपक्रम राबविले जातात त्यामुळे हा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याचा हेतू असल्याने त्यावेळी लावले झाड आज वटवृक्ष झाले असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले.तर यावेळी क्लबच्या वतीने अनेक सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश दामोदर म्हात्रे, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, क्लबचे अध्यक्ष शशिकांत भगत, रोटरीचे अध्यक्ष इम्तियाज मनियार, एमजेएफ लायन्स प्रदीप सिनकर, पोयनाड अरविंद अग्रवाल, रोटेरियन हरेश बेकावडे, आकाश जैन,
रफिक झटाम, नंदेश पाटील आदि उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.