Press "Enter" to skip to content

शिवसेना ठाकरे गटाचा दणका ; पेण उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता करण्यास सुरूवात

पेण, ता. २० (वार्ताहर) : पेण उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि शवविच्छेदन गृह बंद अवस्थेत असून सदर गृहामध्ये उंदराच्या लेंड्या किडे आढळल्याने मृत बॉडीची विटंबना होत असल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली दि.१९ रोजी कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन याबाबत आढावा घेतला व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना नागरीकांच्या आरोग्य विषयीचा जाब विचारला याची बातमी दि.२० रोजी प्रसिद्ध होताच त्यांची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाने आज परिसराची साफसफाई व शवविच्छेदन गृहाची देखील स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयात पसरली अस्वच्छता, अपुरा कर्मचारी वर्ग, डॉक्टरांची कमतरता यासह बंद अवस्थेत असलेले शवविच्छेदन गृह यामुळे येथे येणाऱ्या तालुक्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होऊन रुग्णांचे हाल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता व इतर समस्यां तात्काळ दूर करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांनी संबंधित सफाई ठेकेदाराला याबाबतचे आदेश दिले असता आज रुग्णालयाचे सर्व परिसर तसेच शवविच्छेदन गृह स्वच्छता करण्यासाठी सुरूवात केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.