Press "Enter" to skip to content

ध्वनीक्षेपकांवर  होणारी  कारवाई थांबवा; साऊंड आणि लाईट असोसिएशनची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मागणी


पनवेल (प्रतिनिधी) :
आगामी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव यांसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत राहून व्यवसाय करण्याची संधी द्यावी आणि पोलीस प्रशासनाकडून होणारी कठोर कारवाई थांबवून पोलीस प्रशासनानाने  सहकार्याची भूमिका घेण्यात यावी, या मागणीसाठी साऊंड, लाईट, ट्रस्ट, जनरेटर, एलईडी स्क्रीन ओनर्स असोसिएशन’  च्या शिष्टमंडळाने पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

या निवेदनाची दखल घेत लवकरच पोलीस उपायुक्त व असोसिएशिअन च्या सदस्य पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी  असोसिएशिअन पदाधिकारी , सल्लागार निलेश सोनावणे यांना दिले. निवेदनात नमूद केल्यानुसार, पनवेल परिसरातील  दोनशे ते तीनशे स्थानिक भूमिपुत्र या व्यवसायात कार्यरत असून एका व्यावसायिकावर मालक, कामगार, डीजे ऑपरेटर आणि टेम्पो चालक अशा ५ ते ६ कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, सध्या पोलीस प्रशासनाकडून उच्च डेसिबल आवाजाचे कारण देत थेट साहित्य जप्ती, मोठा दंड आणि पोलीस  कारवाई केली जात आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

असोसिएशनच्या च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात कायदेशीर नियमांचे पालन करून काम करणाऱ्या व्यावसायिकांवर लगेच गुन्हे किंवा जप्तीची कारवाई न करता प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी. आगामी सण-उत्सवांमध्ये कमीत कमी २ बेस (2 Bass) आणि २ टॉप (2 Top) वापरण्याची परवानगी देण्यात यावी., ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास  होणार नाही, यासाठी  पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे  यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात.

स्थानिक भूमिपुत्र व व्यावसायिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि आम्हा व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे  निवेदन 
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी  आमदार प्रशांत ठाकूर यांना  आज दिले आहे .यावेळी मंगेश कांडपिळे
सचिन काळे 
जितेश म्हात्रे 
सुहास सूर्यवंशी
रवी पगडे 
महेश ठाकूर 
प्रतीक बाणे 
अमर पाटील 
केतन फडके 
शशिकांत मुंडकर 
अभिषेक दमडे 
कुशल बाहिरा 
तेजस दळवी 
उपस्तिथ होते 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.