Press "Enter" to skip to content

रायगड चे पालकमंत्री भरत गोगावले यांचे नागोठणे शहरात शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

नागोठणे : प्रतिनिधी (याकूब सय्यद)

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नामदार भरत गोगावले साहेब यांची नवनियुक्ती झाल्याने नागोठणे विभाग व शहरातील शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला नागोठणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठीक दुपारी तीन च्या सुमारास पालक मंत्री नामदार भरत गोगावले साहेब यांचा ढोल ताशाचे गजरात फटाकाच्या आतिषबाजीने हात रुमाल नॅपकिन फिरवित कार्यकर्त्यांनी आनंदोत्साहित होऊन जंगी स्वागत केले.

जंगी स्वागत कार्यक्रमाअंतर्गत पालकमंत्री नामदार भरत गोगावले साहेब यांनी नवनियुक्त नागोठणे शहराचे अध्यक्ष पदी श्री प्रकाश मोरे यांची निवड केली तसेच  शहर अध्यक्ष पदीचे नियुक्ती पत्र प्रकाश मोरे यांना दिले व त्यांना पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या 

त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य श्री सुमित काते शिवसेना रोहा तालुकाप्रमुख मनोज खांडेकर ज्येष्ठ नेते कृष्णा धामणे नागोठणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर नागोठण विभाग संघटक दिनेश घाग नागोठणे शहराध्यक्ष प्रकाश मोरे कार्यकर्ते विहार हेंडे अजीम मुल्ला आसिफ मुल्ला तमाम तरुण शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.