
पनवेल:देशात आणि जगभरात होणाऱ्या मँरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या मँरेथॉन पट्टूसाठी पनवेल महापालिकेची मँरेथॉन स्पर्धां महत्वाची ठरणार आहे. ऑल इंडिया अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या शासनमान्य संस्थेची संलग्न एआयएमएस या संस्थेकडून पनवेल मँरेथॉनला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल मँरेथॉन स्पर्धेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
२३ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये पहिल्यांदाच खारघर हिल महापौर मँरेथॉन होत आहे. ४२ किलोमिटरची हिल मँरेथॉन देशातील पहिलीच मँरेथॉन असल्याचा दावा केला जातो आहे. लोकसहभागातून होणाऱ्या मँरेथॉनला खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६ हजार पेक्षा अधिक खेळाडूंनी आजवर ऑनलाईन नोंदणी केली आहे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मँरेथॉन स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी मॅरेथॉनचे मार्ग अधिकृत पद्धतीने मोजले जातात. एआयएमएस ही संस्था नामांकित संस्था म्हणून प्रसिध्द आहे. ऑल इंडिया अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या अखत्यारित संस्थेने पात्रता कामगिरीच्या मान्यतेसाठी मँरेथॉन मार्गाच्या मोजमापासंबंधी ठरावीक निकष पूर्ण करणे आवश्यक असते.

पनवेल महापालिकेने आयोजित केलेल्या मँरेथॉनचा मार्ग एआयएमएस संस्थेकडून मान्यता मिळाल्यामुळे खारघर हिल महापौर मँरेथॉनला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. पनवेलच्या मँरेथॉनमध्ये धावल्यास धावपट्टूंना संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मँरेथॉनसाठी ग्राह्य धरले जात असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मुंबईत होणाऱ्या नामांकित स्पर्धेशिवाय नवी मुंबईत होणाऱ्या मँरेथॉनमध्ये देखील एआयएमएस प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे देशातील पहिली मोठी हिल मँरेथॉनसोबत एआयएमएस प्रमाणपत्र देणारी मँरेथॉन म्हणून पनवेलच्या मँरेथॉनची चर्चां देशभरातल्या स्पर्धंकांमध्ये आहे.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला महापौर नितीन पाटील ,मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर ,उपमहापौर प्रमिला पाटील,सभागृह नेते प्रकाश बिनेदार,स्थायी समिती सभापती बबन मुकादम , महिला बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे,विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे आदीसह प्रभाग समित्यांचे सभापती उपस्थित होते ल.
महापौरांकडून पहाणी –
बुधवारी खारघर हिल मँरेथॉनच्या मार्गांची महापौर नितिन पाटील यांच्यासमवेत पालिका प्रशासनाने पहाणी केली. मँरेथॉनच्या निमित्ताने पनवेलचे नाव देशभरातील खेळाडूंपर्यंत पोहचणार असल्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला पाटील यांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेचे शुल्क तुलनेने कमी –
लोकसहभागातून होणाऱ्या मँरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी एआयएमएस प्रमाणपत्र असलेल्या स्पर्धेत तुलनेने अत्यंत कमी शुल्क ठेवण्यात आले आहे. एआयएमएस प्रमाणित मँरेथॉनची तुलना केल्यास पनवेलच्या मँरेथॉनचे शुल्क खूप कमी असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.





Be First to Comment