Press "Enter" to skip to content

भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा

आवरे प्रतिनिधी( सचिन पाटील)

भारताचा स्वातंत्र दिवस हा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने साजरा केला. सर्वप्रथम मान्यवर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत व शालेय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यालयाच्या पारंपरिक परंपरेनुसार ध्वजारोहणाचा सन्मान हा एस. एस .सी परीक्षेत अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो आणि तो सन्मान शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च 2026 एस .एस .सी मध्ये अव्वल असणाऱ्या कुमारी श्रुती ऋषीकेश म्हात्रे आणि दिक्षा उदय म्हात्रे विद्यार्थ्यांनीना मिळाला.

प्रथमता राष्ट्रध्वजाचे पूजन करून राष्ट्रध्वज हा फडकावून उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यानंतर राष्ट्रियगीत राष्ट्रगीत ,ध्वजगीत व देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली. यानंतर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाल्याबद्दल वंदे मातरम ची माहिती सर्वांना दिली. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिनाचे प्रात्यक्षिक व काही स्वतंत्र दिन पर विद्यार्थ्यांनि प्रांगणात संचलन केले तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी काही कवायतीचे प्रकार सदर केले.

हा कार्यक्रम आटोपल्यानंतर जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेची प्रभात फेरी ही आवरे गावांमध्ये मोठ्या उत्साहात भारतीय स्वतंत्रदिन पर घोषणा देत आवरे गावात निघाली. यानंतर ग्रुप ग्रामपंचायत आवरे येथील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले तसेच सदर कार्यक्रमात स्कूलचे विद्यार्थी हे गावात मध्ये देशभक्तीपर घोषणा देत गेले. विद्यार्थ्यांनि देशभक्तीपर काही गीत सादर केले तसेच आत्माराम ठाकूर मिशन स्कूल आवरे चे संस्थापक अध्यक्ष व जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे चे निर्माते स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना सर्व विद्यार्थ्या शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरानी भावपूर्ण आदरांजली वाहिली. शैक्षणिक कार्य करत असताना गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आदरणीय अशोक ठाकूर सर यांचा स्वर्गवास झाला अशाप्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या प्रांगणामध्ये देशाचा 80 वा स्वातंत्र्य उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.