Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये रक्तदान शिबिरास समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद१०८ रक्तदात्यांचे योगदान; विविध मोफत आरोग्य तपासण्याही उपलब्ध


पनवेल, दि.१६ (वार्ताहर) : समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची भावना रुजविण्यासोबतच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रुधिरसेतू सेवा संस्था, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) उपसंघ पनवेल, इनर व्हील क्लब पनवेल सिटी आणि राजस्थानी महिला मंडळ – पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक, साधना सदन, विश्राळी नाका येथे १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात १०८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. रक्तदानासोबतच रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी अशा विविध मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. जैन समाजातील समाजबांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमासाठी सर्व सहयोगी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुधिरसेतू सेवा संस्थेच्या वतीने सुरेश रिसबूड, योगेश जोशी, सुनंदा कोठारी, मनीषा बोरा, सुवर्णा भंडारी, धनश्री बांठिया, नरेंद्रकुमार दसरे, उन्मेष लोहार, सानिका मराठे, माधुरी लोहार आणि कु. साम्य लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इनर व्हील क्लब पनवेल सिटीच्या वतीने प्रेसिडेंट स्नेहल कल्याणकर, सेक्रेटरी विजेता कोठारी, कोषाध्यक्ष ध्वनी तन्ना, प्रतिभा डांगी, रीना गुंडेचा, शुभांगी दीक्षित, अर्चना परेश ठाकूर, जयश्री मंगलानी आणि नम्रता बांठिया, पल्लवी मुनोत यांनी मोलाचे सहकार्य केले.

रुधिरसेतू सेवा संस्थेच्या वतीने सर्व रक्तदाते, स्वयंसेवक तसेच उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत युवकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.