Press "Enter" to skip to content

न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९वा पगारवाढीचा करार 

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ 

पनवेल : प्रतिनिधी

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना कामगारांना त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. या वर्षातील ९वा करार करण्यात संघटना यशस्वी झाली आहे.

मे. अमेया CFS (PSA) खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या नेतृत्व कौशल्याने अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ देण्यात यशस्वी झाले आहेत. तसा करार आज कामगार उपायुक्त रायगड यांच्या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सौ. मनीषा काटकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

या करारनाम्यानुसार कामगारांना प्रथमवर्षी तब्बल ८०% पगारवाढ म्हणजे ५७६०/- रुपये तर द्वितीय व तृतीय १४४० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर १४% बोनस ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना गणपती सणापूर्वी पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे त्यामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे. 

या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, सचिव अरुण म्हात्रे, व्यवस्थापनातर्फे HR मॅनेजर श्री. नायर कायदेशिर सल्लागार अॅड. सागर घरत, पर्ल पोर्टलाईन चे मॅनेजिंग डायरेक्टर जमशेद अश्रफ, मॅनेजर विशाल ठाकूर, कामगार प्रतिनिधी सुजित म्हात्रे, महेंद्र भगत, श्रेयस भगत, हितेंद्र म्हात्रे, अक्षय ठाकूर, कुलदीप भगत, प्रशांत ठाकूर, ऋतुराज गावंड, मनिष भगत, नवनित ठाकूर, राम ठाकूर, विलास थळे, विनय म्हात्रे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.