

पेण, ता. 10 (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मुंबई – गोवा महामार्गवरील जिते येथे पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यालयाचे उदघाटन केल्या नंतर पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी साई सहारा रेस्टॉरंट येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या बरोबर संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर यांच्या सह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
साई सहारा रेस्टॉरंट चे मालक व मुंबई – गोवा महामार्गवरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर यांनी शाल, पुष्पगुछ व सन्मान चिन्ह देऊन राज ठाकरे यांचा सत्कार केला.कल्पेश ठाकूर यांच्या महामार्गवरील मदतीचा, कोरोना काळात केलेल्या मदतीची माहिती नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांना दिल्या नंतर राज ठाकरे यांनी या बद्दल उत्सुकतेने अधिक माहिती जाणून घेतली व कौतुकाची थाप कल्पेश यांच्या पाठीवर मारली व ते करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. अत्यंत छोट्या वयात मराठी माणसाने हॉटेल व्यवसायात उतुंग झेप घेतल्या बद्दल देखील राज ठाकरे यांनी कल्पेश ठाकूर यांचे मनसोक्त कौतुक केले. यानंतर साई सहारा रेस्टॉरंट मध्ये उभारण्यात आलेल्या साई मंदिरात साईंचे दर्शन देखील मनोभावे घेतले.




Be First to Comment