Press "Enter" to skip to content

अध्यक्षा संयोगिता टेमघरे तर सचिव पदावर मेघना चव्हाण

इनरव्हील क्लब ऑफ पेण नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

पेण, ता. ८ (वार्ताहर) : इनरव्हील क्लब ऑफ पेण सन २०२६-२७ या वर्षासाठी नविन कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दि. ६ जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यकारणीत अध्यक्ष संयोगिता टेमघरे तर सचिव पदी मेघना चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे.

यावेळी उपस्थित असणाऱ्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून इनरव्हील क्लबचे सामाजिक कार्य आम्ही डोळ्यासमोर पाहत आलो आहोत महिलांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसह विविध सेवाभावी उपक्रमांमध्येही हे क्लब सातत्याने पुढाकार घेत असून त्यांच्या या कार्याला आपला कायम पाठिंबा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर सदर कार्यकारिणीत तन्वी हजारे यांची खजिनदारपदी, दक्षता जाधव आय.एस.ओ.पदावर, राधाराणी यांनी संपादकाची आणि रुची महालकर यांनी क्लब कॉरेस्पॉन्डन्स पदाची जबाबदारी देत भावना पगारे यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.