प्रतिनिधी/ नागोठणे
रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथील कंपनीच्या मटेरियल गेटमधून दोन सशस्त्र बंदूकधारी अतिरेकी सुरक्षारक्षकांना घायाळ करून कंपनीच्या आर्पेट प्लांटमध्ये घुसले आहेत ही खबर सगळीकडे पसरली. कंपनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेचच यावर उपाययोजना सुरू केली. कंपनीच्या एसएसएम ऑफिसला याची सूचना मिळताच त्यांनी त्वरित हेड एच.आर., कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंट, कंपनीचे सर्व डिपार्टमेंट हेड, फायर ब्रिगेड फॅमिली वेल्फेअर सेंटर यांना त्वरित सतर्क करून त्याची माहिती दिली. कंपनीच्या आर.जी.एस.एस या सिक्युरिटी एजन्सीने मार्केटिंग बिल्डिंगच्या कंट्रोल रूमचा ताबा घेतला व त्या ठिकाणाहून पुढील कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. कंपनीच्या कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंट कडून नागोठणे पोलीस स्टेशन, एसपी रायगड, डि.वाय.एस.पी रोहा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, प्रांताधिकारी कार्यालय रोहा व पेण, तसेच तहसीलदार रोहा व पेण या संबंधित कार्यालयांना या घटनेविषयी माहिती देण्यात आली. डी. वाय. एस.पी रोहा प्रसाद गोकुळे यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कळविले
नागोठणे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी आपले कौशल्य पळास पणास लावून क्विक रिस्पॉन्स टीम. म्हणजेच क्यू आर टी आरसीपी राईट कंट्रोल प्लेटून, बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वाड, अँटी टेररिस्ट स्कोॅड रोहा डिव्हिजन व अँटी टेररिस्ट स्कोॅड मुंबई डिव्हिजन यांना त्वरित पाचारण केले. या संबंधित तुकड्यांना कंट्रोल रूम मधून अतिरेकी घुसले असलेली सर्व ठिकाणी दाखविण्यात आली. अतिरेकी आत घुसल्यानंतर त्यांनी कंपनीच्या आर्पेट प्लांटच्या कंट्रोल रूमचा ताबा घेतला व तिथे तिघांना ओलीस ठेवले. सदरहू अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके होती त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून संबंधित पोलीस यंत्रणा अतिरेक्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्या बंदी केलेल्या तिघा ओलिसांची सुटका केली. कंट्रोल रूमच्या मॉनिटरवर या सर्व गोष्टींची क्षणाक्षणाला माहिती मिळत होती. शेवटी पोलिसांनी त्या दोन्ही अतिरेक्यांना पकडून नेले व या खतरनाक लेव्हल टू मॉक ड्रिलचे उद्दिष्ट संपन्न झाले.
हे मोबाईल ड्रिल संपन्न होण्यासाठी एस पी रायगड आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी प्रसाद गोकुळे यांनी काम पाहिले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली वर उल्लेख केलेल्या संबंधित पोलिस यंत्रणेच्या तुकड्या कार्यान्वित होत्या व त्यांनी हे काम चोखपणे पार पाडले. कंपनीच्या आर जी एस एस ग्रुपचे कर्नल गोपाल कृष्णन व अमित तायडे यांनी आपली सिक्युरिटी यंत्रणा कार्यान्वित करून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चोख काम केले. कॉर्पोरेट अफेस डिपार्टमेंटचे अनिल डांगी व रमेश धनावडे यांनी पोलीस डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट, पत्रकार व इतर सर्व सरकारी ऑथॉरिटी यांना मिनिट टू मिनिट माहिती दिली. एच.एस.एफ. डिपार्टमेंटचे सचिन भागवत, निलेश दांडेकर यांनी फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स सर्विसेस यांची चोख व्यवस्थापन पाहिले. हे मॉकड्रिल यशस्वी करण्यासाठी हेड एच.आर. कौशिक चक्रवर्ती, आर जी एस एस चे कर्नल गोपाल कृष्णन, अमित तायडे, कैलाशनाथ महाडिक, कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंटचे अनिल डांगी व रमेश धनावडे, एच.एस.एफ डिपार्टमेंटचे निलेश दांडेकर, फायर डिपार्टमेंटचे संजय कांबडी, फॅमिली वेल्फेअर सेंटरचे आर.एम.ओ. सुनील चौधरी, इस्टेट ऍडमिनिस्ट्रेशन प्रमुख रोहिताश शर्मा तसेच अजिंक्य पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे मॉकड्रिल यशस्वी होण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम घेतले. या मॉकड्रील वेळी सर्कल सुवर्णा पवार, दिलीप खंडारे, प्रवीण साळुंखे , योगेश वार्डे हे सरकारी ऑफिसर्स उपस्थित होते.




Be First to Comment