Press "Enter" to skip to content

मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता

मुंबई- गोवा महामार्गाच्या वडखळ पुलावरील काँक्रिटचा काही भाग खाली कोसळला

पेण, ता. ७ (वार्ताहर) : मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अठरा वर्षापासून सुरू असून आजही अनेक ठिकाणी अर्धवट कामे सुरू आहेत त्यातच येत्या दोन दिवसांपूर्वी वडखळ येथील पुलावरील काँक्रीटचा काही भाग खाली पडल्याने तीथे मोठे भगदाड पडले त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणात पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम साधारणपणे पेण पर्यंत योग्य झाले असले तरी दोन दिवसांपूर्वीच रात्रीच्या सुमारास झालेल्या वडखळ येथील पुलावरील काँक्रीटचा काही थर खाली कोसळल्याने तेथील लोखंडी सळई पूर्णतः दिसू लागली त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना याचा फार मोठा धोका निर्माण झाला होता त्याच दरम्यान प्रवास करणारे मनसेचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांनी स्वतः जाऊन तिथे पाहणी केली असता पडलेला मोठे भगदाड पाहता संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा काम केल्यामुळे सध्या महामार्गाची ही स्थिती ओढावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारांनी याबाबत कोणतीही सखोल तांत्रिक तपासणी न करता रातोरात तो भाग सिमेंटने भरून दुरुस्त केला आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या ठेकेदारावर प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल कारावा अन्यथा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.