Press "Enter" to skip to content

विमानाला ‘वॉटर कॅनन सलामी’ देऊन स्वागत

जग आता नवी मुंबईच्या अधिक जवळ ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय नियोजित विमान दाखल

पनवेल : प्रतिनिधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. अबू धाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे IX208 हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान आज सकाळी 10. 20 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

या ऐतिहासिक आगमनानिमित्त विमानाला पारंपरिक ‘वॉटर कॅनन सलामी’ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवांच्या शुभारंभाची नोंद झाली असून, भारताच्या नव्या जागतिक प्रवेशद्वाराच्या भूमिकेला अधिक बळकटी मिळाली आहे. या पहिल्या आंतरराष्ट्रीय नियोजित उड्डाणामुळे नवी मुंबईचा जगाशी थेट संपर्क अधिक सुलभ झाला असून, प्रवासी, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.