Press "Enter" to skip to content

कै. कमळू पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त कीर्तन सोहळा व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

तळोजे, ता. पनवेल | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तसेच कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांचे वडील कै. कमळू पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी कै. कमळू पाटील हायस्कूल, तळोजे मजकूर, ता. पनवेल, जि. रायगड येथे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता कै. कमळू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह.भ.प. श्री. लालचंद महाराज राजे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला. या कीर्तनासाठी सद्गुरु वामनबाबा पायी दिंडी (रायगड-ठाणे परिसर) यांचीही उपस्थिती लाभली.

या स्मृतिदिनानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार, गावातील वारकरी बांधव, नागरिक, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कै. कमळू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बबनदादा पाटील हे दरवर्षी आपल्या वडिलांचा स्मृतिदिन श्रद्धा, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करतात. या परंपरेतून धार्मिक संस्कार, समाजातील एकोपा आणि सेवाभावाचा संदेश दिला जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर सर्व वारकरी, नागरिक, मान्यवर आणि उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.