Press "Enter" to skip to content

प्रहार संघटनेने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती मागणी !!

पनवेल तालुक्यातील पालक शिक्षक संघ स्थापन न करणाऱ्या खाजगी शाळांवर कारवाई करण्याचे जिल्हा शिक्षण विभागाचे आदेश

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व खाजगी शाळांनी पालक – शिक्षक संघाची स्थापण करण्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे निश्चित केले आहे. तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच माध्यमिक खाजगी शाळांमधील पालक – शिक्षक संघाची स्थापणा केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत सभासदांच्या नावांची यादी आणि कार्यकारी समिति सदस्यांची यादी शिक्षण विभागाकडे सादर करणे बंधनकारक असताना, याची माहिती शिक्षण विभाग, पनवेल पंचायत समिति आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे उपलब्ध नाही असे निदर्शनास आले आहे, हे अतिशय गंभीर असून कायद्याची पायमल्ली आणि उल्लंघन करणारे आहे. म्हणून या सर्व खाजगी शाळांनी पालक – शिक्षक संघाची स्थापना करावी आणि ज्या शाळा पालक – शिक्षक संघाची स्थापन करणार नाहीत अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा शिक्षणाधीकारी, रायगड यांच्याकडे प्रहार संघटनेने केली होती. त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा शिक्षणाधीकारी, रायगड यांनी गट शिक्षणाधीकारी, पनवेल यांना पत्र काढून कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड प्रहार संघटना यांनी दिली.

पनवेल मधील खाजगी शाळा या मार्गदर्शक तत्वांची अमलबजावणी करणार नाही आहे की नाही असा सवाल प्रहारने उपस्थित केला आहे. ज्या खाजगी शाळा नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याबरोबर शाळेची मान्यता काढून घेणे, तसेच अन्य संलग्न मंडळाचे अभ्यासक्रम राबविणार्‍या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र काढून घेणे आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमान्वये देण्यात आलेली शाळांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या ही प्रहारच्या वतीने करण्यात आल्या, यावेळी सोबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी डॉ. सुनील शिरीषकर, ऐड. मनोज टेकाडे, राज्य प्रवक्ते, ऐड. अजय तापकिर, संपर्क प्रमुख कोकण, अजय कदम, राहुल, तेलंग, पंकज मोहिते, अभिनव येलवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.