Press "Enter" to skip to content

दूदूरदृष्टी असलेला कामगार नेता म्हणजे महेंद्रशेठ घरत

CWC द्रोणागिरी कामगारांना 6000 रुपये पगारवाढ : येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे

सन २०२३ पूर्वी १३ वर्ष कंपनी बंद असतांना बजेट CFS यांच्या मार्फत कंपनी सुरु करण्याचा प्रस्ताव आला. त्यावेळी ९००० रुपये पगारावर कंपनी सुरु करण्यात बऱ्याच जणांचा विरोध होता परंतु चारशे ते पाचशे कामगारांच्या चुली पुन्हा सुरु होतील या दूरदृष्टीने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी लोकांनी त्यावेळी केलेल्या टिकेला न जुमानता कंपनी सुरु करून जवळजवळ ५०० कामगारांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला. कंपनी सुरु होवून सहा महिन्याच्या कालावधीतच कामगारांना किमान वेतन देण्यात कामगार नेते महेंद्रशेठ घरत यशस्वी झाले. आणि दिनांक १० जुलै 2026 रोजी किमान वेतनाच्या वर कामगारांच्या पगारात 6000 रुपये वाढ करण्याचा करार सुद्धा महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटने तर्फे करण्यात आला.

या करारनाम्यानुसार कामगारांना प्रथमवर्षी रुपये ३०००, द्वितीय वर्षी १५०० रुपये तर तिसऱ्या वर्षी १५०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगार विमा योजना (ESIS),कामगार कायद्यानुसार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना तिन महिन्याचा पगारवाढीच्या फरकाची रक्कम या महिन्यातच मिळणार आहे. या करारनाम्यामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे, येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे असे उद्गार कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या बद्दल काढले व त्यांचे मनपूर्वक आभार मानले.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगारk संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, बजेट सिएस चे डायरेक्टर संजिव गुप्ता, डायरेक्टर निखिल भंडारे, ऍडमिन मॅनेजर कालिदास यादव, कामगार प्रतिनिधी अरुण पाटील, सुजित पाटील, प्रदिप पाटील, वसंत भोईर, सर्वेश तांडेल, संदीप पाटील, धर्मेश पाटील, मंदा पाटील, प्रकाश गायकवाड व धिरज पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.