Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना पितृशोक

उलवे, ता. १०: उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन भोकाजी पाटील यांचे गुरुवारी (ता. ९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे वडील होत. दिवंगत अर्जुन पाटील यांच्यावर मोरावे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेसाठी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

या अंत्ययात्रेत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत सहभागी झाले होते आणि त्यांनी अर्जुन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अर्जुन पाटील हे सर्वांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असायचे. ते वारकरी संप्रदायाचे पाईक होते आणि त्यांनी आपल्या आयुष्याला भजन-कीर्तनाची जोड दिली होती. त्यामुळे ते शेवटच्या श्वासापर्यंत भक्तीत रमलेले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे मोरावे गावातील एक चांगला माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, याचे मला खूप दुःख आहे. कृष्णा पाटील हे माझ्या घरच्या सदस्यासारखेच आहेत, त्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशा भावना घरत यांनी व्यक्त केल्या.

दिवंगत अर्जुन पाटील यांचा होम विधी शनिवारी (ता. ११) सकाळी ९.३० वाजता मोरावे गावातील ‘अर्जुन भवन’ येथे करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा दशक्रिया विधी शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी लांगेश्वर येथे, तर उत्तरकार्य मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी ‘अर्जुन भवन’, मोरावे येथे करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.