
मोरावे, ता. १० : आपले सहकारी ज्येष्ठ पत्रकार श्री. कृष्णा पाटील यांचे वडील कै. अर्जुन भोकाजी पाटील (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवार दिनांक ९ जुलै २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोरावे गाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते श्री. महेंद्रशेठ घरत यांनी उपस्थित राहून दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अंत्यसंस्कारप्रसंगी दिवंगतांचे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत अर्जुन भोकाजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली.


Be First to Comment