
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः आ.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने येत्या 10 जुलै रोजी माता-भगिनींसाठी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून सदर कार्यक्रम पनवेल नगरपरिषदेचे मा.बांधकाम सभापती व भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य सिद्धार्थ बांठीया यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
आ.विक्रांत पाटील यांचा वाढदिवस येत्या 12 जुलै रोजी असला तरी त्याच्या पूर्व संध्येला म्हणजेच 10 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता रॉयल गार्डन लॉन्स, तहसील कार्यालयाजवळ पनवेल शहर पोलीस स्टेशन शेजारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विविध मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते जवळपास 300 च्या वर माता-भगिनींना मोफत साड्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल नगरपरिषदेचे मा.बांधकाम सभापती व भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य सिद्धार्थ बांठीया यांनी दिली आहे.
तसेच त्या निमित्ताने संगीत व स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पनवेलकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन आ.विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ व आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.





Be First to Comment