Press "Enter" to skip to content

प्रामाणिकपणाचे उदाहरण ! हरवलेला मोबाईल मालकिणीला सुखरूप परत


पनवेल, दि. ८ जुलै २०२६ : पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा आदर्श घालून दिला आहे.

सौ. कामिनी गणेश दलाल (रा. मोहपाडा) यांचा मोबाईल फोन दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हरवला होता. सदर मोबाईल चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांना मिळून आला.

यानंतर पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलची खातरजमा करून तो त्याच्या मालकिणी सौ. कामिनी गणेश दलाल यांना सुरक्षितपणे परत करण्यात आला.

अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने सौ. दलाल यांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिक व नागरिकाभिमुख कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.