
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः भाजपा पनवेल व्यापारी संघ अध्यक्ष संजय जैन यांनी तत्परतेने मदतीचा हात देत जोशी आळी व परिसरात स्वच्छता मोहिम राबवून पावसामुळे तुंबलेले नाले व गटारे साफ करून घेतली.
या संदर्भात त्या भागातील व्यापारी व रहिवाशांनी मुसळधार पावसामुळे नाले व गटारे तुंबल्याने याबाबतची माहिती जैन यांना देताच त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे मा.सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागात स्वच्छता मोहिम राबवून सदर परिसर मोकळा करून दिल्याने तेथील व्यापारी व रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.





Be First to Comment