
लंडनमध्ये ITF च्या जागतिक वाहतूक विभागाच्या बैठकीस ITF आशिया विभागाचे व्हाईस चेअरमन तथा ITF एक्झिक्युटिव्ह बोर्ड सदस्य श्री. महेंद्रशेठ घरत उपस्थित
लंडन : इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) चे आशिया विभागाचे व्हाईस चेअरमन तथा ITF एक्झिक्युटिव्ह बोर्ड सदस्य आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते श्री. महेंद्रशेठ घरत हे लंडन येथे आयोजित ITF च्या जागतिक वाहतूक विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित आहेत.
या बैठकीत जगभरातील विविध देशांतील कामगार प्रतिनिधी सहभागी झाले असून, वाहतूक क्षेत्रातील कामगारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, संघटनात्मक बळकटी आणि भविष्यातील धोरणांवर सखोल चर्चा होत आहे.
ITF आशिया विभागाचे व्हाईस चेअरमन तथा ITF एक्झिक्युटिव्ह बोर्ड सदस्य श्री. महेंद्रशेठ घरत यांनी या बैठकीत भारतासह आशिया खंडातील वाहतूक कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडत जागतिक व्यासपीठावर भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व केले.
भारतीय कामगार चळवळीसाठी ही अभिमानाची बाब असून, श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. 🌍🇮🇳




Be First to Comment