


राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेसचे समाजाभिमुख उपक्रम ; काँग्रेस भवनात ध्वजारोहण, शील आश्रमातील ५०० अनाथ व निराधारांना स्नेहभोजन; युवक-युवतींना पक्षात संधी देण्याची घोषणा
पनवेल, दि. १९ जून : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण आणि सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
यावेळी डॉ. श्रुती म्हात्रे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी काळात पनवेल शहर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली.
“राहुल गांधी ज्या पद्धतीने शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधत आहेत, त्याच धर्तीवर पनवेल शहर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्य सुरू राहील,” असे त्या म्हणाल्या.
येत्या काही महिन्यांत जिल्हाभर डोर-टू-डोर जनसंपर्क दौरा काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. प्रत्येक विभाग, प्रभाग आणि वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्ष प्रभावीपणे पाठपुरावा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींना काँग्रेसमध्ये संधी देण्यात येईल. नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील, असेही डॉ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
विविध पक्षांतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी काँग्रेसच्या विचारसरणीकडे आकर्षित होत असून, त्यांनाही विश्वासात घेऊन पक्षात प्रवेश दिला जाईल. सर्वसमावेशक विचारधारेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शील आश्रम येथे ५०० अनाथ मुले आणि निराधार व्यक्तींना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवसाचा केक कापून आनंद साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सातत्याने पुढाकार घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास डॉ. श्रुती श्याम म्हात्रे (जिल्हाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), जिशान सिद्दिकी, शशिकला सिंग (कार्याध्यक्ष), चेतन म्हात्रे (उपाध्यक्ष), प्रितेश साहू (सरचिटणीस, प्रदेश युवक काँग्रेस), अभिजीत मुंडकल (उपाध्यक्ष), लतीफ नलकांडे (नगरसेवक), अजय कापरे (इंटक मुंबई महानगर अध्यक्ष), शंभू म्हात्रे( कोकाण विभाग अध्यक्ष), जोश जेम्स, मुनावर देशमुख, अरविंद सोनटक्के, आरती ठाकूर, सोनिया सोहोटा, बबन कांबळे, शैलेश म्हात्रे, एकनाथ ठोंबरे, स्नेहा मोटे, हेमंत खैरे, विशाल घोगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले.



Be First to Comment