
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील प्रभाग क्रं.14 साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रं.14 साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंटला बसण्याची खुर्ची (बाकडे), पिण्याच्या पाण्याची सोय, वॉश रुम, आरोग्य केंद्र कंटेनरमध्ये बनविण्यात आले आहे. त्यामुळे अचानक शॉक लागतो तरी ते दुरुस्त करावे. तसेच आरोग्य केंद्राची जागा कमी पडत आहे तरी अधिक एक कंटेनरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेविका आर्या जाधव यांनी केली असून यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते.



Be First to Comment