Press "Enter" to skip to content

अवैध्य गावठी दारूवर रायगड पोलिसांचा हातोडा

नागोठणे पोलीस ठाण्यातर्फे चेराठी, काळकाई जंगल भागात छापा टाकून ०२ ठिकाणी समूळ उच्चाटन करून धडक कारवाई 

नागोठणे : याकूब सय्यद 

प्राप्त गुप्त बातमीच्या आधारे चेराठी काळकाई जंगल परिसरात २५ km आत अवैद्य रित्या गावठी दारू निर्मिती करून विक्री करता बाळगली  जात आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती. आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अभिजीत शिवतरे, उपविभागीय अधिकारी रोहा श्री.प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी, पो. ह./८५६ महेश लांगी, पो. हवा. ८५२ / अथर्व पाटील,सहा. फौजदार कृष्णा म्हात्रे ,पो. शि./१०७२१भालेराव व पथक यांनी चेराठी – काळकाई जंगल परिसरामध्ये २५ किलोमीटर आत जंगलात जाऊन गावठी हातभट्टी दारूचे अड्डा उध्वस्त करून समूळ  उच्चाटन केले. सदर प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक  १०९/२६ व ११०/२६कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आला असून सदर ०२ गुन्ह्यात गुन्ह्यांमध्ये एकूण १, २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. 
सदर ठिकाणी ०२गावठी दारू हातभट्टी छापा कारवाईत:- 

 ०१) पहिल्या ठिकाणी एकूण २० लिटर तयार गावठी दारू व १०००लिटर गूळ मिश्रित रसायन. एकूण रुपये किंमत :-  ५२०००/-

०२

) दुसऱ्या ठिकाणी एकूण २५लिटर तयार गावठी दारू व १४०० लिटर गूळ मिश्रित रसायन. एकूण रुपये किंमत :-  ७२०००/-

सदर प्रकरणी पुढील नागोठणे पोलीस हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.